Home अहमदनगर महिला निर्जनस्थळी थांबून लोकांसोबत करत असते असे दुष्कृत्य

महिला निर्जनस्थळी थांबून लोकांसोबत करत असते असे दुष्कृत्य

crime that women do with people by staying in a secluded place Theft

अहमदनगर | Theft: रस्त्यावर उभे राहून एक महिला मंजुळ स्वरात वाहनचालकांना लिफ्ट मागते. निर्जनस्थळ येताच वाहन थांबायला सांगते आणि चालकाकडे पैशाची मागणी करते. पैसे देण्यास नकार दिला तर आरडाओरडा करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देते. चालकजवळ असतील तेवढे पैसे घेऊन पोबारा करते. अशा प्रकरणात सराईत असलेली महिला नगर जामखेड रस्त्यावर लोकांची लुट करत आहे.

नगर शहरातील वेगवेगळ्या रस्त्यावर या महिलेकडून अनेकांची लुट झाली आहे. अशीच घटना शुक्रवारी दुपारी नगर जामखेड महामार्गावर चांदणी चौक ते टाकळी काझी दरम्यान घडली. नगरहून जामखेडकडे जात असलेल्या वाहन चालक चांदणी चौकात आला असता चौकात उभ्या असलेल्या दोन कॉलेज तरुण आणि एक महिला कारमध्ये बसली. सध्या बस बंद असल्याने मदत करण्याच्या भावनेने वाहन चालकाने त्यांना कारमध्ये घेतले. कॉलेजचे विद्यार्थी सरोळ्यात तर महिला टाकळीस उतरणार असल्याचे सांगितले. दोन युवक सारोळयाला उतरले व महिला टाकळीत कार थांबवायला सांगितले. पर्समधून ५०० रुपये काढून तुमचे भाडे घ्या म्हणून हुज्जत घालू लागली. वाहनचालकाने पैसे घेण्यास नकार दिला. बस बंद असल्याने मी आपणास येथे सोडले. परंतु महिला काही ऐकेना उलट कायद्याची भाषा करू लागली. मी तहसील कार्यालयात नोकरीस असून आमच्या म्याडम यांना बोलावून तुमच्यावर कारवाई करते अशी धमकी देऊन तुमच्याकडे किती पैसे आहेत ते द्या अशी मागणी करू लागली. वाहनचालकाने तीनशे रुपये असल्याचे सांगितले. ३०० रुपये घेऊन ती महिला पसार झाली.  

Web Title: crime that women do with people by staying in a secluded place Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here