Home महाराष्ट्र राज्यातील धक्कादायक बातमी: राज्यात नवे ओमिक्रॉनचे आठ रुग्ण आढळले

राज्यातील धक्कादायक बातमी: राज्यात नवे ओमिक्रॉनचे आठ रुग्ण आढळले

Corona News Update Omicron 28 in Maharashtra

मुंबई | Corona News Update Omicron: राज्यातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज मंगळवारी राज्यात आणखी ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७ रुग्ण मुंबईतील आणि १ रुग्ण वसई- विरार येथील आहे. त्यांच्यातील ३ रुग्ण लक्षणेविरहीत असून ५ रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत. या ८ रुग्णांपैकी सात रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर एकाने अद्याप एकही लसीचा डोस घेतलेला नाही.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात एकूण २८ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.(Update Omicron 28 in Maharashtra ) यामध्ये मुंबई – १२, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरारच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Corona News Update Omicron new 8 in Maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here