Home Accident News Accident: अकोले तालुक्यात इंडिका कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Accident: अकोले तालुक्यात इंडिका कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Two-wheeler killed in Indica car crash in Akole taluka Accident 

अकोले | Accident:  अकोले तालुक्यातील मुळा परीसरातील कोतुळ आंभोळ रोड दरम्यान काल सायंकाळी 6.30 सुमारास इंडिका चार चाकी वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) मोटरसायकलस्वार नितीन शिवाजी कोरडे वय 23  रा. विहीर ता. अकोले या तरुणाचा मृत्यू झाला.

या अपघातातानंतर चारचाकी वाहन चालकाने तिथून पसार झाला आहे. त्यामुळे कोरडे यांना उपचारासाठी वेळ लागल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली.  

अधिक माहिती अशी की, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी असे अनेक प्रकार घडतात मात्र पोलीस यंत्रणेकडून याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले गेले या रोडवर अनेक रोडरोमिओंचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट निर्माण झाला असून कोणतेही चार चाकी वाहन चालक यांचेकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना देखील  अनेक तरुणांकडून असे प्रकार होतात.  इंडीका चालक यांनी माणुसकीचे दर्शन दाखवून त्याला तातडीने उपचारासाठी दाखल केले असते तर त्याचा मृत्यु झाला नसता त्याचे प्राण वाचले असते मात्र धडक दिल्यानंतर ते पसार झाले. चालक आरोपी याने  माणुसकीचे दर्शन घडवले नाही तर उलट या ठिकाणाहून प्रसार झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा संतप्त सवाल देखील या कोरडे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे  यांच्या चारचाकी वाहनांने जोराची धडक देऊन दुचाकी चालक नितीन कोरडे जागीच मृत्यू झाला त्याला उपचारासाठी  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले नसल्याने मुत्यु झाला प्राथमिक उपचार नंतर मात्र परिस्थिती अत्यंत अवघड असल्यामुळे त्यांनी नाशिक  येथिल रुग्णालयात नेण्यात आले होते.  मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली यामध्ये आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी मृत्यू कोरडे यांच्या नातेवाईकांनी अकोले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्याकडे केली होती तर अकोले पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले आहे.

Web Title: Two-wheeler killed in Indica car crash in Akole taluka Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here