Home अहमदनगर विवाहित तरुणीचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ

विवाहित तरुणीचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Suicide case discovery of the body of a married woman in her residence

श्रीगोंदा | Suicide: विवाहित महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यामुळे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या तरुणीचे अवघ्या वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.

अधिक प्राथमिक माहिती अशी की,  पूजा अतुल मोरे (वय २२, राहणार अरणगाव दुमाला श्रीगोंदा) असं मयत तरुणीचे नाव आहे.

पूजाचा मृतदेह राहत्या घरात फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी पती अतुल बाळासाहेब मोरे (वय २७) सासरा बाळासाहेब त्रिंबक मोरे (वय ५२) या दोघांना अटक केली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील रहिवासी असलेल्या पूजाचे गावातीलच अतुल बाळासाहेब मोरे याच्याशी 19 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाले होते.

पती अतुल मोरे याने पूजाकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता.. कार घेण्यासाठी दीड लाख रुपये आणण्यासाठी पूजाकडे मागणी करत होता.

त्यामुळे सासु,सासरे,आणि नंनद या तिघाकडून पूजाचा दररोज मानसिक व शारीरिक छळ होत होता. हा त्रास मयत पुजा माहेरी आई वडील व पती अतुल यांना तोंडी व मोबाईल मेसेज करुन सांगितला होता.

घटनेची माहिती मिळताच पूजाचा भाऊ संदीप दिवटे आणि चुलत्यांनी घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

बेलवंडी पोलिसांनी पती अतुल मोरे व सासरे बाळासाहेब मोरे, सासु वैशाली बाळासाहेब मोरे, ननंद मोहिणी मधूकर ढोले यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अतुल मोरे आणि सासरा बाळासाहेब मोरे याला अटक केली आहे.

माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही. तिला सासरच्या लोकांनी छळ करुण मारले व नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल फोडून तिचा मृतदेह फासावर लटकविला आहे, असा आरोप महिलेच्या भावाने केला आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी सासरीची लोक हजर नव्हती.

Web Title: Suicide case discovery of the body of a married woman in her residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here