Corona Vaccine: १ मे पासून लसीकरण, पूर्वनोंदणी आवश्यक अन्यथा मिळणार नाही लस
Corona Vaccine: सध्या कोरोनाच्या लाटेत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. देशातील तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण १८ वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. मात्र आता कोरोना लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
देशात तिसरा टप्पा १ मे पासून सुरु होणार आहे. १८ ते ४५ या वयोगटातील कोरोना लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना पूर्व नोंदणी आवश्यक आहे. कोव्हीन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅप वर सदर पूर्व नोंदणी करावयाची आहे. अन्यथा लस देण्यात येणार नाही. असे सांगितले जात आहे. मात्र ४५ वर्षावरील सर्वाना लसीकरण जाऊन नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी हा नियम लागू नसेल असे सांगितले जात आहे.
कोरोना केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी ४५ वर्षापर्यंतच्या पात्र सर्वांना पूर्व नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे होणारा गोंधळ टाळता येऊ शकेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Web Title: Corona Vaccine Registration Compulsory