Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १९ तर सायंकाळी १० करोनाबाधित

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १९ तर सायंकाळी १० करोनाबाधित

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज करोना बाधितांची संख्या वाढली आहे. आज सकाळी १९ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले तर सायंकाळी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात २९ करोनाबाधित आढळून आले आहेत.

भिंगार येथील ३५ वर्षीय व्यक्ती, ४९ वर्षीय व्यक्ती, आणि ३८ वर्षीय महिला, आलमगीर (भिंगार) ३८ ववर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे एकाच कुटुंबातील तीन जण आढळून आले आहे. नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय पुरुष, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय पुरुष, सुडके मळा येथील ३० वर्षीय व्यक्तीव २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील सहा वर्षीय मुलगी, सिद्धार्थ नगर येथील ३८ वर्षीय व्यक्ती, माधवनगर येथील ४० वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली आहे.  

पारनेर तालूक्यातील बाभूळवाडी येथील ६२ वर्षीय व्यक्ती, श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष, आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला करोना बाधित आढळून आली आहे.

नगर शहरातील एकवीरा चौक पद्मा नगर येथील ७५ वर्षीय महिला, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ५५ वर्षीय महिला, नगर शहरातील ढवण वस्ती येथील २८ वर्षीय पुरुष, नगर शहरातील चितळे रोड येथील ३६ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर येथील ७० वर्षीय महिला, नगर शहरातील बालिकाश्रम रोड बागवान मळा येथील एकाच कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलगी, राजुरी (ता.जुन्नर, जि. पुणे) येथील ३६ वर्षीय पुरुष, परळ (मुंबई) येथून पिंपरी पठार (पारनेर) येथे आलेला २८ वर्षीय पुरुष, जामखेड येथील ४२ वर्षीय पुरुष हे सर्व करोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४५१ झाली आहे.

Web Title: Coronavirus Ahmednagar 29 corona Patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here