Home संगमनेर संगमनेर तालुक्यात कुरण येथे तीन करोनाबाधित रुग्ण आढळले

संगमनेर तालुक्यात कुरण येथे तीन करोनाबाधित रुग्ण आढळले

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ४१ वर्षीय व ५१ वर्षीय व्यक्तींना करोनाची बाधा झाली आहे तर ३९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. 

मागील बाधित महिलेच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या १०९ वर पोहोचली आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात आज एकूण १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ४४१ वर गेली आहे.

Website Title: Coronavirus Sangamner kuran three patient corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here