अहमदनगर जिल्ह्यात शतक पार, आणखी चार करोनाबाधित, १० महिन्याच्या बाळाला करोना
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज नवीन चार रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांच्या संखेने शतक पार केले आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १०३ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात घाटकोपरहून आलेल्या अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेल्या वडिलांस व त्यांच्या मुलीस करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे तर नेवासा तालुक्यात दोन आणि श्रीगोंदा येथे एक रुग्ण आढळून आला आहे.
दरम्यान आज जिल्ह्यातील चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चार जण करोना मुक्त झालेले आहेत.पाथर्डी येथील ०१, संगमनेर येथील ०१ तर सारसनगर येथील २ जण यांस डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर येथील संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच धक्कादायक म्हणजे श्रीगोंदा येथील आढळलेल्या पहिल्या रुग्णाच्या घरातीलच १० वर्षाच्या लहान बाळाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाळाचा कालचा अहवाल निगेटिव आला होता मात्र पुन्हा तपासणी केल्यानंतर करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली आहे.
Website Title: Coronavirus Ahmednagar corona infected hundered