संगमनेर शहरात भारतनगर येथे एक करोना पॉझिटिव्ह आढळला
संगमनेर: संगमनेर शहराची चिंता वाढतानाच दिसत आहे. सलग गेल्या चार दिवसांपासून करोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. संगमनेर शहरात भारतनगर येथे एका ६६ वर्षीय जेष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुधवारी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातून चार संशियीतांचे स्त्राव तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त असून त्यातील भारतनगर येथे राहणाऱ्या एका ६६ वर्षीय नागरिकाला करोना लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचा अहवाल मिळताच स्थानिक प्रशासन मोगलपुरा परिसरात धाव घेतली असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उदाली आहे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीकडून संगमनेर शहरात करोनाचा प्रसार वाढत आहे. याचाच धडा घेऊन नागरिकांनी घरातच थांबणे आवश्यक आहे. या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील दोघांना ताब्यात घेतले असून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती समजते. त्याचबरोबर आणखी संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून सुरु आहे.
Website Title: Coronavirus Sangamner Bharatnagar one person positive