Home अकोले अकोलेत पिंपळगांव खांड येथे आणखी दोन करोनाबाधित एकूण सहा जण  

अकोलेत पिंपळगांव खांड येथे आणखी दोन करोनाबाधित एकूण सहा जण  

अकोले: अकोले तालुक्यामध्ये पिंपळगाव खांड येथे आणखी दोन करोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघेही परगावी म्हणजेच मुंबईवरून आल्याचे समजते. त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.

पिंपळगाव खांड येथील दोघांना त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या पिंपळगाव खांडमध्ये तीन बाधित आढळून आल्याने गाव सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांना विलगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते.

अकोले तालुक्यांमध्ये गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाने व्यवस्थापन करून जे नियोजन केले होते. ते मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई ठाणे नाशिक पुणे या ठिकाणावरून आलेल्या नागरिकांना कोलमडले आहे, आता सहावर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी प्रशासनावर विसंबून राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Website Title: Coronavirus Akole Another two patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here