Home अकोले अकोलेकर प्रतीक्षेत तर  जिल्ह्यातील सोमवारी सर्व अहवाल निगेटिव्ह

अकोलेकर प्रतीक्षेत तर  जिल्ह्यातील सोमवारी सर्व अहवाल निगेटिव्ह

Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यात सोमवारी १३३ संशियीत रुग्णांचे करोना अहवाल प्राप्त झाले. हे सर्व संशियीत निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आठ रुग्णांनी करोनावर मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये नगर शहरातील चार, श्रीगोंदा येथील तीन आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान सोमवारी सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ असे ६८ असे एकूण १३३ करोनाचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली आहे.

अकोले शहरातील व्यापारी पेठेतील कापड दुकानदारमधील कर्मचारी याचा अहवाल निगेटिव्ह आला आहेत तसेच ब्राम्हणवाडा येथील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अकोले शहरात रविवारी आढळून आलेल्या चालकाच्या संपर्कातील चार व ब्राम्हणवाडा येथील दोन संशियीत व्यक्तींचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.  

Website Title: Coronavirus Ahmednagar corona report nil 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here