Home Suicide News विहिरीत उडी घेऊन पती पत्नीची आत्महत्या, बहिण वाचली

विहिरीत उडी घेऊन पती पत्नीची आत्महत्या, बहिण वाचली

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी येथील किरकोळ वादातून दोघा पती पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल घडली आहे.

ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर वय ३० व पत्नी सविता खोतकर वय २५ या दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या बहिणीचा तोल जाऊन विहिरीत पडली मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेने तिला वाचविण्यात यश आले.

तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील रेलावाडी याठिकाणी मयत ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर आई वडील बहिण, पत्नी, मुलगी असे परिवारात राहत असे. ज्ञानेश्वरचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. ज्ञानेश्वरच्या पोटात काल सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्याने आपल्या पत्नीसह कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात धाव घेतली होती. ते उपचार घेऊन घरी आल्यावर झोपले असताना ज्ञानेश्वर हा रात्री दहा वाजेच्या सुमारास ओरडत आला. त्यामागे पत्नी सविता ओरडत येत असताना आवाज ऐकून आई वडील जागे झाले. त्यांना पुढे मुलगा त्यापाठोपाठ पत्नी आणि त्यामागे त्याची बहिण पळताना दिसून आले. मुलाने थेट विहिरीत उडी मारली त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीने उडी मारली. या दोघांना वाचविण्यासाठी त्याच्या बहिणीचा तोल जाऊन तीही विहिरीत पडली. मात्र या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जागे होऊन मदतीसाठी आले. त्यातील काहींनी विहिरीत दोर सोडून बहिणीला वाचविण्यात यश आले मात्र अगोदर उडी मारलेले पती पत्नी विहिरीच्या तळात गेल्याने ते मयत झाले.

या घटनेत या पती पत्नीचे भांडण कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Web Title: Wife Husband suicide by jumping into well 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here