Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज करोनाचे १० रुग्ण पॉझिटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यात आज करोनाचे १० रुग्ण पॉझिटिव्ह

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आजच्या दिवशी दहा नवीन रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या १४१ झाली आहे. सलग तीन दिवसांपासून बाधितांचा आकडा वाढतच चाललेला आहे.

आज प्राप्त झालेल्या अह्वालात ५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दहा पॉझिटिव्ह आले आहेत. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली २८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे.  कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे दोन आढळून आले आहेत. हे  बाधीत रुग्णाचे नातेवाईक असून संपर्कातून यांना करोना संक्रमित झाला आहे.  
संगमनेर पाच रुग्ण आढळून आले आहे यात  कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी ची लक्षणे आढळून आली त्याबरोबरच करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक आढळून आले आहे. हे  बाधिताच्या संपर्कातील आहेत असे समजते. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळून आला आहे.  हा सुद्धा मागील रुग्णाच्या संपर्कातील संक्रमित रुग्ण आहे.

जिल्ह्यात सध्या ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आज राशीन येथील सहा वर्षीय मुलीने करोनावर मात केली आहे. ती बरी होऊन तिला घरी सोडण्यात आले आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar ten corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here