संगमनेरात धोका: तालुक्यात करोनाचे आणखी पाच पॉझिटिव्ह
संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाचा धोका वाढलेला आहे. संगमनेर तालुक्यात आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संगमनेर करोनाबाधितांची संख्या ४४ झाली आहे.
आज सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील करोना अहवाल प्राप्त झाले असून आज १० करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यातील पाच रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यात कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी (श्र्वसनाचा त्रास) ची लक्षणे आढळून आली त्याचबरोबर कोरोना अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक हे बाधिताच्या संपर्कातील आहे अशी माहिती समजते.
संगमनेरमधील ही वाढलेली संख्या तालुक्यासाठी एक धोक्याची सुचना आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासन करीत आहे.
Website Title: Coronavirus sangamner another five Corona patient