Home अहमदनगर मुंबईवरून आलेला तरुण आईने घरात नाही घेतला आणि तो करोनाने

मुंबईवरून आलेला तरुण आईने घरात नाही घेतला आणि तो करोनाने

नेवासा: बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातून जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.  मुंबईवरून आलेला तरुण आईने घरात न घेता घराबाहेर ठेवला आणि दुर्दैवाने या मुलाचा अहवाल दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह आला. शनिवारी सायंकाळी याचा अहवाल प्राप्त झाला त्यात तो बाधित आढळला नेवासा तालुक्यातील सातवा करोना रुग्ण आहे.

तालुक्यातील कारेगाव येथे भांडुपला वॉचमन म्हणून काम करीत असलेला तरुण भानसहिवरा गावाच्या आठ मित्रांबरोबर शुक्रवारी दिनांक २९ मे पहाटे घरी आला. आईने देखील त्याला घराबाहेरच ठेवले. त्याला संस्थेत क्वारंटाइन करण्यात आले. त्यावेळी कोणतेही लक्षण दिसत नव्हते.

मात्र रात्री आरोग्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की त्याला ताप आला आहे. त्यामुळे त्याला रात्रीच नगरला पाठवून तपासणी करण्यात आली. शनिवारी सायंकाळी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.

आता यातील एक जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने  या आठही जणांना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान जागेतील क्वारंटाइन सेंटरमध्ये कोरांटाइन केले आहे.

Website Title: Coronavirus young man came from Mumbai 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here