Home संगमनेर संगमनेर: मुळा नदी पात्रात दोन सख्खे भाऊ बुडाले

संगमनेर: मुळा नदी पात्रात दोन सख्खे भाऊ बुडाले

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत बुद्रुक येथील खैरदारा परिसरात वाहणाऱ्या नदीपात्रात दोन सख्खे भाऊ बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

तेजस शरद कातोरे (वय ९)  व सुरज शरद कातोरे (वय ५)  हे दोन सख्खे भाऊ नदीपात्रात अंघोळीला गेले असता बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. शरद कातोरे हे खैरदार येथे राहतात त्यांची दोन मुले तेजस आणि शरद जवळच्या मुळा नदी पात्रात अंघोळीला गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आहे. घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध सुरु केला. ते नदी पात्र जवळ गेले असता त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. ही माहिती घारगाव पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून काढून शवविचेद्नासाठी नेण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

Website Title: Latest News Two brothers drowned in the Mula river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here