Home अकोले Coronavirus: अकोले तालुक्यात आज करोना चाचणीत सहा बाधित

Coronavirus: अकोले तालुक्यात आज करोना चाचणीत सहा बाधित

Akole Taluka six corona infected today news

अकोले | Coronavirus: अकोले तालुक्यात आज अॅटीजेन चाचणीत सहा करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ६०२ इतकी झाली आहे. राजूर, विठे आणि चिंचवणे या गावांचा समावेश आहे.

आज प्राप्त अहवालात राजूर येथील ६१ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय तरुणी, विठे येथे ३० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुणी, १४ महिन्याची बालिका, चिंचवने येथे ६० महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधित संख्या ६०२ वर पोहोचली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी दिली आहे.

तालुक्यात ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Coronavirus Akole Taluka six corona infected today news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here