Home अकोले अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला उत्पादन घेण्यास मंजुरी: माजीमंत्री मधुकरराव पिचड

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला उत्पादन घेण्यास मंजुरी: माजीमंत्री मधुकरराव पिचड

Approval for ethanol production project Agasti Sugar Factory Akole

अकोले (प्रतिनिधी): अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल (आसवनी) प्रकल्पाला (ethanol production) उत्पादन घेण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या गळीत हंगामा पासून इथेनॉल उत्पन्न घेऊ शकू. अशा प्रकारची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.

कारखान्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कारखान्याने इथेनॉल प्रकल्प हाती घेतला होता. त्याची बांधणी पूर्ण झाली असून उत्पादन घेण्यास इथेनॉल प्रकल्प सज्ज झाला आहे अशी माहिती यावेळेस त्यांनी दिली.

अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापना होऊन पंचवीस वर्षे झाली आहेत. स्पर्धेच्या काळामध्ये शेजारील कारखान्यांच्या भावाशी स्पर्धा कायम ठेवत कारखान्याने ऊस उत्पादकांचे हित सतत साधले आहे आणि त्यातून या कारखान्याच्या बरोबर जे कारखाने उभे राहिले होते,ते जवळपास आजारी किंवा बंद स्थितीत आहेत. मात्र अगस्ती सहकारी साखर कारखाना आता वेगाने घोडदौड करत असून इथेनॉल उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये अधिकचा भाव टाकता येईल अशा प्रकारची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण विभागाने ‘ ना हरकत दाखला ‘ दिल्यावर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्पादन घेण्याच्या दृष्टीने हिरवा कंदील दाखवला. आणि त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये गळीत हंगाम सुरू होत असून या गळीत हंगामात हा प्रकल्प लागलीच उत्पादन घेण्यास सुरुवात करील असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष बाब म्हणजे इथेनॉलला चांगल्या प्रकारची मागणी सध्या तरी टिकून आहे आणि  को -जनरेशन च्या प्रकल्पांना तशा अर्थाने कोणत्याही प्रकारचा सध्या तरी वाव दिसत नाही आणि म्हणून या कामी दूरदृष्टी आम्ही दाखवली. त्याचा आम्हाला निश्चितपणे आनंद वाटतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हा प्रकल्प उभा करण्याकामी देशाचे जेष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, त्याचबरोबर साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप , वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,संचालक विकास देशमुख यांनी वेळोवेळी या प्रकल्पासाठी बहुमोल मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच हा प्रकल्प उभा राहू शकला याबद्दल त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले.

ऊस उत्पादकांच्या दृष्टीने इथेनॉल प्रकल्प सुरू करणे ही आनंदाची बातमी आहे.एक्ससाईजचा परवाना मिळाला,त्यामुळे साखर उत्पादनाचाही निश्चितपणे फायदा होईल. साखर उत्पादकांना उसाला भाव वाढवून देण्यास शक्य होणार आहे. इथेनॉल निर्मिती  व केंद्राच्या धोरणामुळे इथेनॉलला चांगला भाव भेटेल आणि कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी हा प्रकल्प संजीवनी ठरेल.

सीताराम पा.गायकर उपाध्यक्ष

प्रत्यक्ष उत्पादन घेण्याच्या दृष्टीने जो परवाना हवा होता तो मिळाल्याने नजिकच्या काळामध्ये कारखाना सुरू झाल्याबरोबर  मोलासिसची निर्मिती होऊन कारखान्याला उत्पादनाबरोबरच विक्रीलाही परवाना भेटल्याने सर्व कारखाना आता चैतन्यात न्हाऊन निघत आहे.

भास्करराव घुले, कार्यकारी संचालक

इथेनॉल प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम शुभारंभ दि.५ डिसेंबर १९९२.

1)प्रकल्प ऊभारणीकरीता ८ ऑगस्ट २०१६ रोजी मा.साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून हेल्थ सर्टिफिकेट

2) केंद्सरकारच्या वाणीज्य आणि ऊद्योग मंत्रालयाकडून दि.५ सप्टेंबर २०१६ ला आसवणी प्रकल्पासाठी प्रथम औद्योगिक प्रमाणपत्र

3) वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे यांचेकडून ऑक्टोबर २०१६ मध्ये आसवणी प्रकल्पाचा डी.पी.आर.रक्कम रु.४७.९६ कोटीचा प्रकल्प अहवाल तयार व प्रस्तावास दि. १५ सप्टेंबर २0१७ रोजी मंजुरी

४) भारत सरकार ,मिनीस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट अ‍ॅन्ड क्लायमेंट चेंजेस, नवी दिल्ली कार्यालयाकडून पत्र दि.३१ मे २०१७ ला प्राप्त

५) आसवणी प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक जन सुनावणी दि.८ सप्टेंबर  २0१७

6) दि ६ जुलै २0१८ रोजी मिनीस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट अ‍ॅन्ड क्लायमेंट चेंजेस,नवी दिल्ली यांचे कडे प्रस्ताव व त्याला ८ जाने २0१९ रोजी कारखान्यास   मान्यता पत्र प्राप्त

७) वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट, पुणे यांचे कार्यालयात २५ फेब्रुवारी २0१९ रोजी तांत्रिक कमिटीची मिटींग, 

त्यानंतर दि. २७ फेब्रुवारी २0१९ रोजी साखर भवन, पुणे येथे साखर संघ कार्यालयात मशिनरी खरेदी समितीच्या सभेत आसवणी प्रकल्प ऊभारणीची अंतिम मिटींग सन २0१६ प्रकल्प अहवालानुसारच रु.४६.00 कोटी डिस्टलरी प्रकल्प निविदा अंतिम,

 ८) नव्याने प्रकल्प अहवाल तयार

 रु.६0.४६ कोटी आर्थिक व प्रशासकीय मंजुरीसाठी मा.साखर आयु, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. आसवणी प्रकल्पाच्या सर्व निविदा जुन्या डी.पी.आर. (47.96 कोटी) पेक्षा कमी किंमतीत (46.26 कोटी) अंतिम झालेल्या आहेत.

आसवणी प्रकल्पाची ठळक वैशिष्ठे

1)आसवणी चालविण्यासाठी 270 दिवसाची परवानगी आहे.

2) आसवणीसाठी रोज 115 ते 120 मे.टन मळीचा वापर होणार आहे.

3) आसवणी प्रकल्पातून प्रतिदिन 30,000  लिटर ऊत्पादन होणार आहे.

4) आसवणी प्रकल्पातून रेक्टीफाईड स्पिरीट, एक्स्ट्रन्युट्रल अल्कोहोल व इथेनॉल निर्मिती होणार आहे.

5) आसवणी प्रकल्पातून तयार होणा-या स्पेट वॉश पासून मिथेन गॅसची निर्मिती होणार असून, त्या गॅसचा वापर बॉयलरला बॉयलर इंधन म्हणून वापर होणार आहे. त्यामुळे कारखान्याचा भुस्सा वापर यात बचत होणार आहे.

6) बायोगॅस मधून निघणा-या स्पेंटवॉशची  तीव्रता वाढवून त्यापासून बायोकंपोस्ट खत तयार होणार असून, बायोकंपोस्ट खताचा पी.एच., एन.पी.के. चे प्रमाण नियोजित असणार आहे.

7) इव्हेपोरेशन व डिस्टलरीतून निघणारे कंडेन्सेट पाण्याला ट्रिटमेंट करुन त्याचा पुनर्वापर करणार असल्याने मोठया प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे.

8) सदर प्रकल्प हा प्रदुषण मुक्त असणार आहे.

Web Title: Approval for ethanol production project Agasti Sugar Factory Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here