अकोलेत आढळलेला रुग्ण ढोकरी गावाशी संपर्क आला नाही, लिंगदेवचे ७ अहवाल निगेटिव्ह, ३ प्रतीक्षेत
अकोले: अकोले तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण हा घाटकोपरहून आलेला लिंगदेव येथे आलेला आढळून आला आहे. त्यापाठोपाठ अकोले तालुक्यातील ढोकरी येथील एका ३६ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या व्यक्तीस प्रशासनाने नगरला तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले.
हा तरुण २३ मे रोजी मुंबई येथील घनसोली भागातून अकोले येथे आला होता. त्यास संशयावरून तपासणीसाठी नगरला पाठविले होते. तेथे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा ढोकरी गावाशी संपर्क आला नाही या वृत्तास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभिरे यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान घाटकोपर येथून आलेल्या शिक्षकाचा सरकारी अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे. लिंगदेव येथील या शिक्षकाच्या संपर्कातील ७ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिंगदेवचे ३ अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी सांगितले. लिंगदेवचे ३ अहवाल प्रतीक्षेत असल्याने अकोलेकरांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. तसेच लिंगदेव गाव हे लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.
Website Title: Coronavirus Akole two Patient of corona