Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील पाहुण्यांच्या संपर्कातील आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर जिल्ह्यातील पाहुण्यांच्या संपर्कातील आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर: लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे मुंबई पुणे आलेल्या लोकांना करोनाची बाधा झाल्याचे समजल्याने नगर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई पुणे या ठिकाणाहून आलेल्या पाहुण्यांमुळे जिल्ह्याची करोना बाधितांची संख्या ही वाढतच चालली आहे. या पाहुण्याच्या संपर्कात आलेल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील  करोना टेस्ट ल्यबमध्ये आज संपर्कातील आलेल्या व्यक्तींचे स्त्राव घेऊन तपासणी केली असता जिल्ह्यातील विविध भागातील १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.

वाचा: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग 

अहमदनगर शहर ०४, भिंगार कॅम्‍प ०४, श्रीगोंदा तालुका ०३, कर्जत तालुका ०२, श्रीरामपूर ०१, नेवासा ०१ , पाथर्डी ०१ असे एकूण १६  व औरंगाबाद जिल्‍हयातील खुलताबाद तालुका ०१ असे एकूण १७ अहवाल निगेटिव आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने आज दिली आहे.

अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील उर्वरित तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अकोलेकारना दिलासा मिळाला आहे. 

हे जे करोनाबाधित व्यक्ती सापडले त्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने नगरला दिलासा मिळाला आहे.

Website Title: Latest News corona reports Ahmednagar district is negative

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here