Home संगमनेर संगमनेर तालुक्यात मुंबईहून आलेल्या ११९ व्यक्ती कॉरांटाइन

संगमनेर तालुक्यात मुंबईहून आलेल्या ११९ व्यक्ती कॉरांटाइन

संगमनेर: करोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबई व इतर शहरातून आलेल्या ११९ व्यक्तींना बोटा व परिसरातील गावांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून करोना संसर्ग आजारामुळे अनेक व्यक्ती सध्या आपल्या गावाकडे येत आहेत. गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच पोलीस पाटील, व इतर सदस्य यांचा सहभाग असलेली करोना सुरक्षा ग्रामसमिती सध्या येणाऱ्या या व्यक्तीचे पंधरा दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे.

बोटा माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी, व म्हसवंडी या गावांमध्ये बाहेरून आलेल्या ११९ व्यक्तींना विलगीकरण करण्यात आले आहे. अशी माहिती करोना सुरक्षा समितीच्या सदस्यांनी दिली.

Website Title: Latest News Sangamner taluka 119 quarantine Akole News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here