Home संगमनेर संगमनेरमध्ये गर्दी, नियमांचे उल्लंघनप्रकरणी दोन दुकानांना सील

संगमनेरमध्ये गर्दी, नियमांचे उल्लंघनप्रकरणी दोन दुकानांना सील

संगमनेर: संगमनेर शहरात व धांदरफळ बुद्रुक व कुरण येथील हॉटस्पॉट काढल्यानंतर आज मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरु झालेली पहायला मिळाली. दुकाने सुरु झाल्याने खरेदीसाठी गर्दी उसळली होती. बऱ्याच ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. प्रशासनाने दोन दुकानांना सील ठोकले आहे.

संगमनेर शहरात व तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी ९ मे ते २३ मे पर्यंत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला होता. नंतर व्यापारी संघटनांनी एकत्र येत एकदम गर्दी होऊ नये या उद्देशाने पुढील तीन दिवस शहरातील दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. याला व्यापारी संघटनांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर शहरात मंगळवारी दुकाने उघडण्यात आली.

दुकानांमध्ये सॅनिटायजर नसणे, सोशियल अंतर पाळणे असे काही कारणांमुळे शहरातील नवीन नगर रोडवरील इलेक्ट्रीकल दुकान, मोबाईल शॉपी, ही दोन दुकाने सील करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दुकाने सील करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. 

Website Title: Latest News Sangamner Seal two shops in violation of rules

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here