Home अहमदनगर नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण

नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण

अहमदनगर: नगर शहरात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात ४ पुरुष व १ महिला आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील सत्त्या कॉलनीतील ही घटना असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.

त्याचबरोबर संगमनेर शहरातील दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते शहरातील भारतनगर व मोमिनपुरा या भागातील आहे. नगर जिल्ह्यात एकाच दिवशी सात करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणाना करोनाची लागण झाल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे बाहेरुन येनारेंची संख्या वाढत असल्याने तसेच ते थेट घरी जात असल्याने करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.  

Website Title: Coronavirus one family five people in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here