Home संगमनेर धक्कादायक: संगमनेर शहरात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह

धक्कादायक: संगमनेर शहरात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह

संगमनेर: संगमनेर शहरात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील भारतनगर येथे एक ३३ वर्षीय पुरुष आढळून आला आहे. तो कालच्या बाधिताच्या संपर्कातील बाधित असल्याचे समजते तर मोमीनपुरा येथे ७१ वर्षीय जेष्ठ नागरिक पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगमनेर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. आता स्थानिक प्रशासन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परिसर सील करण्याची तयारी सुरु आहे. संगमनेरातील वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. संगमनेर शहरात गेल्या चार दिवसांपासून सलग चार दिवस करोना बाधित आढळून येत असल्याने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे.  

 

Website Title: Coronavirus Sangamner two patient positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here