Home अहमदनगर लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या  

लॉकडाऊनमुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या  

राहुरी: राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात बेरोजगारी निर्माण झालेली आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशाच राहुरी येथील एका खाणकाम मजुराने हाताला काम नसल्यामुळे उपासमारिची वेळ त्याच्यावर आल्याने या मजुराने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात समोर आली आहे. बाळू रामभाऊ गुंजाळ वय ३५ या तरुणाने आत्महत्या केली आहे.

हा तरुण खाणकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता मात्र गेल्या अडीच महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकानी सांगितले. या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

या घटनेची माहिती राहुरी पोलिसांत कैलास रामभाऊ गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहे.  

Website Title: Latest News Young man commits suicide due to depression 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here