Home अकोले अकोलेत एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह, करोनाचा रेकॉर्ड एकाच दिवशी १३ जण व...

अकोलेत एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह, करोनाचा रेकॉर्ड एकाच दिवशी १३ जण व २ मृत्यू

अहमदनगर:  अकोले तालुक्यातील केळुंगण येथील एक ४० वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात आज करोनाने रेकॉर्ड  केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी १३ जण बाधित आढळून आले तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीने आज उच्चांक गाठल्याने खळबळ उडाली आहे. सायन (मुंबई) येथून केलुगण ता. अकोले येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आले होते तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे,

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ०४ व्यक्ती बाधीत आढळून आल्या.

राशीन (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत आहे. पुण्यास नोकरीला असणाऱ्या पत्नीस भेटून आला होता गावी परत आला होता.

घाटकोपरहून टाकळीमिया ता.राहुरी येथे आलेल्या १७ वर्षीय मुलीला लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची नातेवाईक आहे.

निमगाव ता. राहता येथील बाधीत महिलेचा २० वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाली आहे.

सायन (मुंबई) येथून केलुगण ता. अकोले येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

संगमनेर अकोले तालुक्यात सलग चार दिवस रुग्ण आढळून येत असल्याने या दोन्ही तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

Website Title: Coronavirus Ahmednagar Akole record corona

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here