Home अकोले कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचा जीव धोक्यात

कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ड्युटी करणाऱ्या शिक्षकांचा जीव धोक्यात

अकोले: कोरोना साथीच्या काळात प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांना चेक पोस्ट, क्वारंटाईन केंद्र , स्वस्त धान्य दुकानांवर नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व शिक्षक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.

सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु शासनाने त्या शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही सोयीसुविधा पुरविलेल्या नाहीत. तेव्हा या नेमणुका शिक्षकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. त्यामुळे ज्या शिक्षकांना अशा नेमणुका दिलेल्या आहेत ते  शिक्षक मानसिक दडपणाखाली काम करत आहे.

तरी शासनाने त्या शिक्षकांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन त्यांना एन 95 मास्क, ग्लोज, फेसशील्ड, सॅनीटायझर, हायड्रोक्लोरोक्वीन, अर्सेनल थर्टी गोळ्या इत्यादी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गणपत सहाणे यांनी केली आहे. तसेच महिलांना रात्रीची ड्युटी देऊ नये, 50 वर्षापेक्षा वरील शिक्षक, अपंग, दुर्धर आजारी यांना या कामातून वगळावे अशी मागणी शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब हासे,तानाजी वाडेकर,राजेंद्र भांगरे,गोरक्षनाथ देशमुख,सुदाम धिंदळे,तुकाराम आवारी,दिपक बो-हाडे,सदाशिव आरोटे,संजय भोर, राजू थोरात,बाळासाहेब आवारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Website Title: News coronavirus infection threatens teachers’ lives

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here