Home अकोले शेरणखेल येथे पिकअप उलटून एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी

शेरणखेल येथे पिकअप उलटून एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी

राजूर: अकोले येथून एक हजार कौले घेऊन पाभूळवंडीकडे जात असतांना शेरणखेल येथे चालक दारु पिलेला असल्यामुळे वाहनावरील ताबा जाऊन पिकअप रसत्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यामध्ये विठ्ठल उगले (वय-३८) (पाभूळवंडी) यांचा नाशिक येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाला. त्यांचे लहान बंधू तुकाराम उगले (वय३२), चूलत बंधू जयराम उगले (वय ४५) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.

पाभूळवंडी येथे विठ्ठल हरी उगले यांच्या घराचे काम चालू आहे. पावसाळा ऐन दहा-पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असतांना घरांवर कौले घालण्याचे बाकी होते. अकोले येथून कौले खरेदी केली. यावेळी चालक यांनी अकोले येथून दिड खोके दारु माल खरेदी केला होता. दारु पिलेला असल्यामुळे पिकअप वरील चालकाचा ताबा सुटून पिकअप रस्त्येच्या कडेला जाऊन पलटी झाला असतांना चालकाने पळ काढला. 

चालक जवळ दोन व्यक्ती बसलेल्या होत्या. यावेळी चालक व त्याच्या सोबत असलेली व्यक्ती अपघात स्थळापासून पळ काढला. यावेळी इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेत असलेला पांडू उगले (वय १४) यांनी कौले बाजूला काढून स्थानिक नागरिकांची मदत घेवून जखमी व्यक्तींना बाहेर काढून खाजगी गाडीने रुग्णांना अकोले येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विठ्ठल उगले यांना या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असल्यामुळे त्यांचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्यात एक मुलगा, तीन मुली व पत्नी व आई आहे.

Website Title: News Akole the pickup overturned one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here