Home संगमनेर धक्कादायक: संगमनेर तालुक्यात करोनाचा पाचवा बळी

धक्कादायक: संगमनेर तालुक्यात करोनाचा पाचवा बळी

संगमनेर: संगमनेर शहरात आज मादिनानगर परिसरात करोना बाधित व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. या ५५ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संगमनेर शहरात एकच खळबळ उडाली आहे तसेच तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील फालुदा विक्रीचा व्यवसाय करणारा ५५ वर्षीय व्यक्तीला गुरुवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला संगमनेर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्रास अधिक वाढल्याने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने त्याला अहमदनगर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र त्याला श्वसणाचा अधिक त्रास जाणवू लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक ठरली आणि त्यातच दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे संगमनेरमधील मृत्यूची संख्या पाच झाली आहे. संगमनेर तालुक्यात एकूण ३२ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संगमनेरमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुका हा हादरलेला आहे. सर्वत्र खळबळ उडाली आहे.  

Website Title: Latest News Fifth victim of corona in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here