अहमदनगर जिल्ह्यात आणखी नऊ रुग्ण संगमनेर दोन तर अकोले एक बाधित
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कालच शतक पार झाल्यानंतर आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण आणखी वाढले असून, ६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.
संगमनेर, अकोले, पारनेर, शेवगाव आणि राहता आदी भागातील हे नऊ करोना बाधित आढळून आले आहेत.
घाटकोपर येथून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे ०१ आढळून आला आहे. एकट्या पिंपळगाव खांडमध्ये हा चौथा रुग्ण आढळून आला आहे. घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधीत रुग्णाच्या संपर्कातील आहे.
संगमनेर शहरातील मदिनानगर भागातील ५५ वर्षीय व्यक्तीस व ४० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे.
ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला एक, संगमनेर शहरात दोन, निमगाव ता. राहता ४ या ठिकाणी करोनाबाधित आढळून आले आहेत.
या बाधित रुग्णांमध्ये पुरुष ४, महिला ४ आणि एक चार वर्षीय मुलीचा समावेश आहे.
मागील गेल्या चार दिवसांपासून संगमनेर व अकोले तालुक्यात करोनाबाधित आढळून येत असल्याने चिंता वाढत आहे.
Website Title: Coronvirus Ahmednagar sangamner Akole total nine