संगमनेरमध्ये मदिरानगर येथे आणखी दोन करोना पॉझिटिव्ह
संगमनेर: संगमनेर शहरातील मदिरानगर भागातील ५५ वर्षीय व्यक्तीस व ४० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी व गुरुवारी जिल्हा रुग्णालयात काही संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले आहे. यात मादिरानगर परिसरात असणाऱ्या ५५ वर्षीय फालुदा विक्रेत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर त्याच परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती बेकरीचा व्यवसाय करीत असल्याने मालेगाव कनेक्शनमधुनच करोनाची लागण झाली असण्याची दाट शक्यता आहे.
संगमनेर स्थानिक प्रशासनाने या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु केले आहे. संगमनेर शहरात नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने शहरात संक्रमांची शक्यता वर्तविली जात आहे. संगमनेर शहरात दररोज नवीन करोना बाधित आढळून येत असल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Website Title: Coronavirus Sangamner madiranagar two positive