Home संगमनेर संगमनेर शहरात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर, कोठे काय असणार सुरु

संगमनेर शहरात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर, कोठे काय असणार सुरु

संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथील मालपाणी नगरमधील एका व्यक्तीस करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा भाग ९ जुन पर्यंत प्रतिबंधात्मक म्हणून घोषित करण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

या क्षेत्रात करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे नागरिकांना येण्यास व जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आरोग्य पथकाद्वारे पुढील १४ दिवस येथील रहिवासी नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. कोणीही घराबाहेर पडू नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सशुल्क सुरु करण्यात येणार आहे.  प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले आहे.

भारतनगर येथील ६८ वर्षीय व्यक्तीला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतनगर,रहेमतनगर, उम्मतनगर, डोंगरे मळा, पठारे मळा प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच बुधवार दिनांक १० जुन पर्यंत येथील सर्व आस्थापना व अत्यावश्यक सेवा, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. येथील वाहनांचे आवागमन देखील प्रतिबंधित करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

शहरातील दुकाने नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत सुरु असून या कालावधीत कोणीही गर्दी करणार नाही यासाठी प्रशासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे.   

Website Title: Latest News Prohibited area declared in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here