Home संगमनेर संगमनेरात आणखी दोन महिला करोना पॉझिटिव्ह, अर्धशतक पूर्ण

संगमनेरात आणखी दोन महिला करोना पॉझिटिव्ह, अर्धशतक पूर्ण

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी दोन महिलांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मालुंजे डिग्रस येथील आणखी दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहोचली आहे.

रविवारी संगमनेर तालुक्यात पाच जणांना करोनाची लागण झाली होती. यातील मालुंजे डिग्रस येथील ५२ वर्षीय महिलेच्या संपर्कातील मालुंजे डिग्रस येथील ४५ व २१ वर्षीय  दोन महिला बाधित झाल्या आहेत. यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. 

संगमनेर तालुक्यात करोनाची लागण ही बाहेरून आलेल्या बरोबरच संपर्कातून होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे संगमनेर तालुक्यात करोनाचा धोका वाढलेला आहे. संगमनेरचा करोना बाधितांचा आकडा हा अर्धशतकावर पोहोचला आहे.

संगमनेर तालुक्यातील २३ रुग्ण उपचार घेत असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २२ रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. 

Website Title: Coronavirus updates Sangamner Another two ladies Positive 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here