Home संगमनेर संगमनेर धोक्याची पातळी एकाच दिवशी ५१ करोनाबाधितांचा उच्चांकी आकडा, आणखी २१

संगमनेर धोक्याची पातळी एकाच दिवशी ५१ करोनाबाधितांचा उच्चांकी आकडा, आणखी २१

Coronavirus Sangamner highest record corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात सकाळी ७, सायंकाळी २३ आणि रात्री उशिरा २१ असे एकूण ५१ रुग्ण आढळून आल्याने उच्चांकी गाठली आहे. संगमनेर तालुक्यातील वाढणारी करोनाची रुग्णसंख्या धोक्याची घंटा बनली आहे. सातत्याने पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त होताना दिसत आहे.  

संगमनेर तालुक्यात  उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगी व ५ वर्षीय मुलालाही मागील व्यक्तीच्या संपर्कातून करोनाची बाधा झाली आहे.

शहरातील भारत चौक येथे ६३ वर्षीय व्यक्तीसह त्याच्या ५५ वर्षीय पत्नीलाही करोनाची लागण झाली आहे. अभिनव नगर येथे ६९, ४१ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. नवीन नगर रोड परिसरात ७३ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर शहरातील मालदाड रोड ३७ वर्षीय युवकाला, ऑरेंज कॉर्नर येथील ५५ वर्षीय पुरुष, जनतानगर ३० वर्षीय महिला, घुलेवाडी येथील ३० वर्षीय महिला, घुलेवाडी मालपाणी नगर येथील ३८ वर्षीय युवकाला करोनाची लागण झाली आहे.

निमोण येथे ६६ वर्षीय, ६५ वर्षीय, ७१ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. शहरातील लाखमीपुरा ३२ वर्षीय युवक, रहेमतनगर ५४ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाली आहे. घुलेवाडी येथील ३ वर्षीय मुलास, जोर्वे येथील ३३ वर्षीय पुरुष, निमोण येथील ६० वर्षीय पुरुषास करोनाची लागण झाली आहे. या प्राप्त झालेल्या अह्वालात शासकीय अहवाल त्याचबरोबर खासगी अह्वालांचाही समावेश आहे. संगमनेर तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २८६ झाली आहे.   

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner highest record corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here