Home संगमनेर संगमनेर तालुक्यात आणखी दहा करोनाबाधित एकूण ३३२

संगमनेर तालुक्यात आणखी दहा करोनाबाधित एकूण ३३२

Coronavirus Sangamner taluka 10 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. आज शुक्रवार सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच रुग्ण शहरातील व पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३३२ झाली आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे ४० वर्षीय पुरुष, रहेमतनगर येथे ३ वर्षीय बालिका, श्रमिक नगर येथे ४४ वर्षीय महिला, गणेशनगर येथे ३६ वर्षीय पुरुष, तालुक्यातील निंबाळे येथील ३८ वर्षीय पुरुष, निमोण येथील २७ वर्षीय पुरुष यांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील ८२ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे २८ वर्षीय पुरुष, शहरातील शिवाजीनगर येथे ६५ वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील शिबलापूर येथे २७ वर्षीय तरुण यांना करोनाची लागण झाली आहे. वाढत्या करोनाबाधित संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka 10 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here