Home संगमनेर Coronavirus: संगमनेर तालुक्यात 38 जणांना करोनाची बाधा

Coronavirus: संगमनेर तालुक्यात 38 जणांना करोनाची बाधा

संगमनेर | Coronavirus: संगमनेर शहर व तालुक्यामध्ये कोरोनाने जोरदार पुनरागमन करत मागील 36 तासात जोरदार बरसला आहे. सकाळी 65 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता संध्याकाळी पुन्हा 38 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गेल्या 36 तासात तब्बल 103 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहर व तालुका पुन्हा एकदा हायअलर्ट वर गेला आहे. कोरोनाची ही बॅटिंग बघून सर्वत्र चिंताजनक व घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन आता काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान गुरुवारी संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार शहरातील शिवाजीनगर येथील 41 वर्षीय पुरूष, अभिनव नगर येथील 26 वर्षीय तरुणी,  मेन रोड येथील 48 वर्षीय पुरुष, रहाणे मळा येथील 55 वर्षीय पुरुष, वकील कॉलनी येथील 24, 25 वर्षीय तरुण व 48, 80 वर्षीय महिला, गिरीजाविहार कॉलनी येथील 35 वर्षीय इसम व 57 वर्षीय महिला, हासें मळा येथील 52 वर्षीय पुरुष व भारत नगर येथील 31 वर्षीय महिला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर तालुक्यातील  वडगाव पान येथील 26 वर्षीय तरुणी, जाखुरी येथील 38 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 56 वर्षीय पुरुष, निमोण येथील 62 वर्षीय महिला, सोनेवाडी येथील 35 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द येथील 43 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथील 48 वर्षीय पुरुष, लोहारे येथील 64 वर्षीय पुरुष,  कुरकूटवाडी येथील 40 वर्षीय महिला व 75 वर्षीय वृद्ध, बोटा येथील 55 वर्षीय महिला, वायळ वाडी येथील 26 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी येथील 28 व 42 वर्षीय महिला, 95 वर्षीय वृद्ध, 25 वर्षीय तरुण, चांदनापुरी येथील 07 वर्षीय बालिका, 43, 55, 72 वर्षीय महिला व 33, 38, 42 वर्षीय पुरुष, खराडी येथील 38 वर्षीय महिला, आणि साकुरी येथील 52 वर्षीय पुरुष असा एकूण ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: Coronavirus Sangamner Taluka 38 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here