संगमनेरमध्ये सय्यदबाबा चौक व कुरण येथे आढळले करोनाबाधित
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज दोन करोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यात दोघांची भर पडून एकूण संख्या ११२ झाली आहे.
संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागात सय्यदबाबा चौक येथे ७० वर्षीय वृधास करोनाची लागण झाली आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथे आणखी एका ६३ वर्षीय महिलेस करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ११२ वर पोहोचली आहे.
संगमनेरमधील स्थानिक प्रशासन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेण्याचे काम करीत आहे. संगमनेरमध्ये करोनाला ब्रेक लागेनासा झाला आहे. सातत्याने संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संगमनेर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची गरज आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
Website Title: Coronavirus Sangamner taluka new patient fouund