नाशिक पुणे महामार्गावर कारच्या धडकेत दोघे जण जखमी
संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबी खालसा फाटा येथे कार व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात दोनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात मच्छिंद्र शंकर दुधवाडे वय २१ रा. घारगाव, यशवंत हेमंत जाधव वय ३० रा. चिंचाळ ता.राहुरी हे दोघे जण जखमी झाले आहेत.
कारचालक यमनप्पा रामप्पा मगदूम रा. मलकापूर जि. बेळगाव हे कारमधून आळेफाटा मार्गे घारगावच्या दिशेने नाशिककडे जात होते. गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबी खालसा फाट्याजवळ दुचाकीवरून जात असताना कार व दुचाकीची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार महामार्गाच्या बाजूला फेकले गेले यात दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णवाहिकेद्वारे आळेफाटा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहने बाजूला करण्यात आले. याप्रकरणी कारचालक यमनप्पा रामप्पा मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Website Title: News Two persons were injured in a car collision Sangamner