Home संगमनेर संगमनेर करोना ब्रेकिंग: तालुक्यात सहा करोना बाधित, एकूण ३६५  

संगमनेर करोना ब्रेकिंग: तालुक्यात सहा करोना बाधित, एकूण ३६५  

Coronavirus Sangamner taluka Six corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात करोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. संगमनेर तालुक्यातील रॅपिड अँटीजन व खासगी अहवाल प्राप्त झाले आहेत. यात तालुक्यातील सहा करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ३६५ वर पोहचली आहे.

संगमनेर शहरालगत गोल्डन सिटी येथील ३७ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.  खंडोबागल्ली परिसरात ३६ वर्षीय तरुण करोनाबाधित आढळून आला आहे. घुलेवाडी ३५ वर्षीय तरुण व दोन वर्षीय बालकाला करोनाची लागण झाली आहे. राजापूर येथील १७ वर्षीय तरुणी करोनाबाधित आढळून आली आहे. कसारा दुमाला येथील ७७ वर्षीय जेष्ठ नागरिकाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील संख्या ३६५ झाली आहे.

दरम्यान संगमनेर तालुक्यातील आज ३२ जण करोनामुक्त झाले आहेत. ते बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka Six corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here