Home संगमनेर संगमनेर तालुक्यात गुरुवारी एकूण १४ करोनाबाधित एकूण १९४

संगमनेर तालुक्यात गुरुवारी एकूण १४ करोनाबाधित एकूण १९४

Coronavirus/संगमनेर: गुरुवारी सकाळी जनतानगर येथे एक करोनाबाधित आढळून आला. त्यांनतर गणेशनगर दोन, निमोण एक नांदूर खंदरमाळ एक असे सायंकाळी चार रुग्ण आढळून आले. गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा ९ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.

यामध्ये घुलेवाडी येथील १२ वर्षीय मुलगी, ३४ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला असे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

त्याचबरोबर कासारा दुमाला येथील ७४ वर्षीय वृद्धाला व २४ वर्षीय तरुणीला करोनाची लागण झाली आहे.  

हिवरगाव पावसा येथील ७० वर्षीय महिला, गुंजाळवाडी परिसरातील २९ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय तरुणी आणि मिर्झापूर येथील ४० वर्षीय पुरुषाला करोनाची बाधा झालेली आहे. असे गुरुवारी एकाच दिवशी १४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची संख्या १९४ वर पोहोचली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka Thursday 14 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here