Home संगमनेर संगमनेरमध्ये आढळले आणखी दोन करोना पॉझिटिव्ह एकूण ५७

संगमनेरमध्ये आढळले आणखी दोन करोना पॉझिटिव्ह एकूण ५७

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आणखी दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संगमनेर मध्ये एकूण करोनाबाधित संख्या ५७ वर पोहोचली आहे. मुंबई येथून शेडगाव येथे आलेल्या ६३ वर्षीय महिलेला करोनाची लागण झालेली आहे तर शहरातील मादिनानगर येथे मागील व्यक्तीच्या संपर्कातून एक ५६ वर्षीय व्यक्तीला करोना लागण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी या दोघांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त होऊन त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमनेर शहरातील प्रशासन सतर्क झाले असून संपर्कातील व्यक्तीची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

Website Title: coronavirus Sangamner two corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here