Home अकोले पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

अहमदनगर: पुणे संगमनेर नाशिक रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाला पाठविलेल्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात मंजुरी दिली होती. या सेमी स्पीड रेल्वेने पुणे नाशिक प्रवास हा फक्त दोन तासाचा होणार आहे. तसेच या रेल्वेमुळे संगमनेर अकोले नगर जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.

याबाबत राज्यसरकारने लवकर पावले टाकले तर नगर आणि नाशिकच्या विकासाला फायदा होणार आहे. या रेल्वेमुळे शिर्डी, अशी अनेक तीर्थस्थळे जोडली जाणार आहे. एमआय डीसीना सुद्धा याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे, हडपसर, वाघोली,कोलवडी, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर नारायणगाव,आळेफाटा, बोटा, जांबूत, साकुर, आंबोरे संगमनेर, देवठाण, दोडी, सिन्नर, मूढारी, शिंदे आणि नाशिक रोड असा रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. २३१ की.मी. लांबीच्या या मार्गाचे ड्रोन सर्वेक्षण सुरु असून जवळपास १८० की.मी. चे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या रेल्वेमार्गासाठी १३०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.    

Website Title: News Ministry of Railways approves Pune-Sangamner-Nashik railway  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here