Home अहमदनगर अहमदनगरचा करोनाचा आकडा पोहोचला ३१ वर

अहमदनगरचा करोनाचा आकडा पोहोचला ३१ वर

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णाचे बरे होण्याचे प्रमाण सुरु असताना आणखी दोन करोनाबाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात करोना मयतांची संख्या ३ वर आहे.  

जामखेड येथील दोघांचे अहवाल सोमवारी पॉझीटीव्ही आले. हे दोघेही मयत करोनाबाधीताची मुले आहेत. नगर जिल्ह्याचा करोना बाधितांचा आकडा वाढून ३१ वर पोहोचला आहे. यात सावर्धिक रुग्ण जामखेडमधील आहे. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी पाठविलेल्या दोन व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. हे दोघेही काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या रुग्णांची मुले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डो. प्रदीप मुरंबीकर १५ एप्रिल रोजी जिल्हा रुगणालयात मृत्यू झाला होता मात्र त्याला करोनाची लक्षणे असल्याने मृत्यूपूर्वी त्याचेही नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला नव्हता त्यामुळे त्याच्या कुटुंबियातील घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले त्यांचे अहवाल सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी प्राप्त झाला त्यात त्याचे २९ आणि ३५ वर्षीय मुले करोनाबाधित असल्याचे आढळून आले.

Website Title: Coronavirus total 31 in Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here