Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा बनला चिंताजनक

अहमदनगर जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा बनला चिंताजनक

coroners in Ahmednagar district has become alarming

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा हा वाढतच असून एकूण १८०० नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील स्थिती ही चिंताजनक बनत चालली असल्याचे दिसत आहे.

गेल्या २४ तासांत १ हजार ८०० जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नगर शहरामध्ये सर्वाधिक ४५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर राहता, श्रीरामपूर, नगर तालुका, कोपरगाव, पाथर्डी तालुक्यात रुग्णसंख्या ही शतकी पार आढळून आली आहे.

अहमदनगर शहर ४५६, राहता २०८, संगमनेर ७१, श्रीरामपूर १३४, नेवासे ७२, नगर तालुका १०७, पाथर्डी १३६, अकोले ६२, कोपरगाव ११०, कर्जत ७३, पारनेर ५१, राहुरी ८७, भिंगार शहर ८१, शेवगाव ३७, जामखेड ४४, श्रीगोंदे ३६ आणि इतर जिल्हे ३५ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे.

जिल्ह्यातील आज ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ९०.२४ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात सध्या ८३३५ रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: coroners in Ahmednagar district has become alarming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here