Home अहमदनगर अनैतिक संबधातून खून करणाऱ्या आरोपींस जन्मठेप

अनैतिक संबधातून खून करणाऱ्या आरोपींस जन्मठेप

Accused of murder through life imprisonment 

अहमदनगर: अनैतिक संबधाच्या वादातून शेवगाव येथे झालेल्या खुनाच्या(Murder) आरोपावरून न्यालायाने दोघांना जन्मठेप व प्रत्येकी ११ हजार रुपये अशी शिक्षा दिली आहे. या खटल्यात एकूण तीन आरोपी आहेत. एकाचा तुरुंगातच मृत्यु झालेला आहे.तर दोघांना शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.

बापूसाहेब एकनाथ घनवट यांच्या खुनाच्या आरोपावरून शिक्षा देण्यात आली आहे. दिनांक ७ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री शेवगाव पाथर्डी रस्त्यावरील जामा मशीद ट्रस्टच्या मोकळ्या जागेत राहत असलेल्या महिलेच्या पालावर बापूसाहेब घनवट गेला होता. यावेळी तेथे असलेले परमेश्वर भोंड, कृष्णा भोंड, लक्षमण कांबळे या तिघांनी बापूसाहेब घनवट याचे पठारावरील महिलेशी अनैतिक संबध असल्याचे संशयावरून मारहाण करून त्याचे तोंड दाबून झोपडी मागे नेले व मोठ्या लोखंडी खिळ्याने चेहऱ्यावर वार करून ठार मारले. बापुसाहेबाचा भाऊ काकासाहेब घनवट याने शेवगाव पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासात खुनामध्ये तिघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी दोषरोपपत्र सादर केले. या खटल्यात ८ साक्षीदार तपासण्यात आले. या गुन्ह्याचा तपास शेवगावचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकूर यांनी केला.

Web Title: Accused of murder through life imprisonment 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here