Home अहमदनगर पतीनेच स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

पतीनेच स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

Murder Case husband himself killed his wife by throwing a stone Sangamner

संगमनेर | Murder Case: गाईचे दुध काढण्याच्या कारणावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बोडकेवाडी शिवारात घडली आहे. गुरुवारी सायंकाळी आरोपीस गजाआड केले आहे.

भारती शिवाजी दिघे असे या हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. संगमनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बोडकेवाडी येथील शिवाजी दिघे यांचा नानज दुमाला येथील भारती हिच्याशी २०११ विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. या दोघांमध्ये अधून मधून किरकोळ कारणावरून सतत भांडणे होत असत.

भारती हिचा पती शिवाजी हा आपल्या गाईचे दुध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यावेळी गायीची कासेला सूज आलेली होती. त्यावेळी गायीची कास कशामुळे सुजली आहे असे विचारले असता भारती व शिवाजी या दोघांत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात शिवाजीणे भरतीच्या डोक्यात दगड घालून हत्या केली.

जखमी असलेल्या भारतीला शिवाजी णे संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉ. प्रदीप कुटे यांनी महिलेस ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर रुग्णालयात शावविचेदन करण्यात आले.

नान्नज दुमाला येथील मयत भारतीचा भाऊ भाऊ जिजाबा वाणी यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी शिवाजी दिघे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

Web Title: Murder Case husband himself killed his wife by throwing a stone Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here