Home अहमदनगर Crime: बापानेच केला मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime: बापानेच केला मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime father himself molested the girl 

कोपरगाव | Crime: कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत्या घरात झोपलेली असताना आरोपी बाप तिला झोपेतून उठवून पाय दाबण्याच्या बहाण्याने जवळ झोपून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे,

याबाबत अधिक माहिती अशी की, करंजी येथील एका अल्पवयीन मुलीचा नराधम बाप व त्याच्या पत्नीचे भांडण सुरु आहे. मुलीची आई ही औरंगाबाद येथे राहते. याचाच फायदा घेऊन निर्लज्ज बापाने हे दुष्कृत्य केले आहे.

यबाबत या मुलीने पोस्टाचा वापर करत ही दुर्दैवी घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास कळविली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबत या अल्पवयीन मुलीची फिर्याद दाखल करून घेतली आहे, कोपरगाव पोलीस ठाण्यात या पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करत फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. तसेच जर तु आरडाओरडा केला, कोणाला काही सांगितल्यास तर तुला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहे.  

Web Title: Crime father himself molested the girl 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here