संगमनेर तालुक्यात ६९८ रुग्ण उपचार घेत आहे तर ८५० बेडची व्यवस्था
संगमनेर: संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत ८ हजारांपेक्षा अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
दिनांक १ एप्रिल रोजी शहरात १७ तर ग्रामीण भागात ४६ असे ६३ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर आत्तापर्यंत ६३ जणांमुळे करोनाने बळी घेतल्याची शासकीय नोंद आहे. सध्या शहर व तालुक्यात ६९८ रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती संगमनेर पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाने दिले आहे.
सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना पूर्वी गृहविलागीकारणात ठेवण्यात येत होते. मात्र काही ठिकाणी गृहविलगीकरनामधील रुग्ण बेफिकीरपणे वागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाचा वाढता धोका लक्षात घेता गृहविलगीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या रुग्णांनी घरी न राहता शासकीय केअर सेंटरमध्ये उपचार घेणे बंधनकारक राहील. प्रशासनाला सहकार्य करावे, नियमांचे भंग करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
Web Title: Sangamner Corona Sangamner taluka 698 patients are undergoing treatment