Home भंडारा विषाने भरले दोन ग्लास, दाम्पत्याने सोबत घेतले घोट, दोघांचा मृत्यू  

विषाने भरले दोन ग्लास, दाम्पत्याने सोबत घेतले घोट, दोघांचा मृत्यू  

Bhandara: दाम्पत्याची विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Couple commits suicide by poisoning

एकोडी | भंडारा : आजारपणाला कंटाळून किन्ही (ता. साकोली) येथील रामू आसाराम बघेले (६५) आणि त्यांची पत्नी शांता (५९) यांनी एकाच वेळी विष घेतले. उपचारादरम्यान पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासादरम्यान दोन ग्लास आणि विषाची बाटली दिसली.

रामू बघेले यांच्याकडे अडीच एकर शेती होती. जगदीश (३५) या एकुलत्या एक विवाहित मुलासह ते राहत होते. ३ जूनला दुपारी रामू व पत्नीने गोठ्यात जाऊन विष घेतले. हा प्रकार सुनेच्या लक्षात येताच तिने पतीला कळविले.

दोघांना भंडारातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ७ जूनला सकाळी शांता बघेले यांचा तर दुपारी रामू बघेले यांचाही मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात या दोघांनीही शुगर, दमा, टीबी असल्याने आपण आजाराला कंटाळलो होतो, यामुळे हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

अंत्यविधीएकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या वृद्ध दाम्पत्याने आयुष्याचा शेवटही सोबतच केला. रामू बघेले आणि त्यांची पत्नी शांता या दोघांच्याही मृतदेहावर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डोळ्याच्या कडा पाणावल्या.

Web Title: Couple commits suicide by poisoning

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here