Home अकोले अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका: वीज पडून म्हशी दगावल्या

अकोले तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका: वीज पडून म्हशी दगावल्या

Unseasonable Rain:  कोतूळसह परिसरात शनिवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे पडली तर कोतूळ बसस्थानक परिसरात वीज (lightning)पडून दोन म्हशी दगावल्या.

Kotul News Buffaloes were killed by lightning

कोतूळ | Kotul: कोतूळसह परिसरात शनिवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे पडली तर कोतूळ बसस्थानक परिसरात बाळासाहेब वामन खरात यांच्या दोन म्हशी वीज पडून दगावल्या. जूनचा पहिला आठवडा संपूनही पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.

कोतूळ परिसरात शनिवारी दुपारी अचानक जोराचा वारा आला वादळी वाऱ्याासह जोरदार पाऊस झाला. यावेळी ढगांचा गडगडाटही होत होता.  काही वेळातच सगळीकडे पाणी वाहू लागले. बसस्थानक परिसरात एका झाडाखाली बांधलेल्या दोन म्हशी झाडावर वीज पडल्याने दगावल्या. लागले. जिल्हा परिषदेचे कोतूळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य शंकर घोलप यांनी सांगितले.

Web Title: Kotul News Buffaloes were killed by lightning

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here